शासकीय कामकाजात संदेस (Sandes) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ४७/२.व का १ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक - २६ जुलै, २०२४.
App डाऊनलोड करण्यासाठी -
प्रस्तावना- केंद्र शासन आणि राज्य शासन, शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेश आणि संप्रेषणांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप आणि नस्ती इत्यादींमधील माहितीचीदेखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते. संदेस अॅप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन - G२ G (Govt.to Govt.) आणि शासन ते नागरिक G२C (Govt.to Citizen) संप्रेषण/संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे. संदेस ही सुरक्षितपणे शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित प्रणाली आहे. तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे. संदेस अॅप हे गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
संदेस (Sandes) अॅप हे Play/App Store वर प्रकाशित झालेल्या डेटा गोपनीयता आणि डेटा धारणा धोरणाद्वारे (Data Privacy and Data Retention Policy) नियंत्रित केले जाते. संदेस (Sandes) अॅप हे " सुरक्षा प्रथम" तत्त्वावर आधारित आहे आणि त्याद्वारे संदेश पाठविणारा व प्राप्त करणारा यांच्यामध्येच (एंड टू एंड एन्क्रिप्टेड) संदेशवहन प्रदान करते. संदेस (Sandes) प्लॅटफॉर्म केवळ सांख्यिकीय विश्लेषणासाठी मेटाडेटा संग्रहित करतो आणि म्हणून प्रत्यक्ष संदेश पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. सर्व वितरित न झालेले संदेश एन्क्रिप्टेड स्वरूपात केवळ मर्यादित कालावधीसाठी साठवले जातात. कोणत्याही गैरवापराची तक्रार झाल्यास गैरवापराचा उगम शोधण्याची संदेस (Sandes) अॅपमध्ये क्षमता आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही अॅपचा वापर न करता "संदेस" या NIC ने तयार केलेल्या अॅपचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते.
शासन परिपत्रक-संदेस (Sandes) अॅप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते. याव्यतिरिक्त, संदेस (Sandes) अॅपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-
१. संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला Data सुरक्षित ठेवणे.
२. शासन/शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित (Customization) करण्याची सुविधा.
३. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी eGov अॅप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण.
४. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा.
५. SMS च्या ऐवजी ओटीपी, अॅलर्ट, सूचना व प्रसारण करणारी संदेस ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे.
६. सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथक्करण.
७. संदेस पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय.
८. संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा.
९. शासनासाठी योग्य जिमोजी (शासकीय इमोजी) आणि टॅगसह डिझाइन केलेले संवाद.
१०. डेस्कटॉप/लॅपटॉपसाठी संदेस वेब आवृत्तीची उपलब्धता. (sandes.gov.in)
११. संदेस पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेश प्रसारणाची सुविधा.
१२. पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख.
१३. eGov अॅप्लिकेशन्समधून मेसेज आणि फाइल्स पाठवण्यास साहाय्य करते.
१४. अॅप्लिकेशन्समधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते.
१५. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स (एकाबरोबर एक आणि सामाईक)
१६. एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते.
No comments:
Post a Comment